एखादा माणूस मोठा होतो म्हणंजे नक्की काय होतो हे बघायचे असल्यास हिंदुरावांकडे बघावे.

महाविदयालयीन कालपासूनच आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक त्यांनी दाखवली होती. १९८१ साली बिर्ला कॉलेज मध्ये असताना ते NSUI. चे जनरल सेक्रेटरी झाले या काळात त्यांनी अनेक मोठी कामे केली . १९८३ ते १९९१ या काळात ते महाराष्ट्र चे सरचिटणीस होते. त्यांच्यातील नेता याच काळात घडत होता विद्यार्थांचे अनेक मेळावे त्यांनी घेतले आणि NSUI ची पाळेमुळे खोलवर रुजवली आणि स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला.

हिंदुराव मुळचे शेतकरी कुटुंबातले होते शेतीची त्यांना आवड होति. आणि त्याचे एक वेगळा परिणाम त्यांचा कारकीर्दीवर झाला ते दीर्घकाळ कृषी उत्पन्न’ बाजार समितीत कार्यरत होते त्यामुळे त्यांच्यातील नेता आणखीनच बहरत गेला शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले त्यानाचाय्साठी मोठी बाजारपेठ असावी म्हणून प्रयत्नशील राहिले . मा . शरद पवार यांच्या साह्याने ते उतरवले देखील., मार्केट यार्ड साठी निधी मंजूर करून घेतला यासारखी अनेक कामे त्यांनी केली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ते नावारूपाला आले. कल्याण कृषी उत्त्पन्न बाजार समितीत त्यांनी सर्वाधिक काळ काम केले त्यामुळे हिंदुराव आणि समिती हे एक समीकरणच झाले १९९७ पासून त्यांची गाजली ती ठाणे जिल्हा परिषदेत.

सलग १० वर्षे ते ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून ते निवडून गेले यातून त्यांची लोकप्रियता किती होती ते दिसून येते कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे २००३ साली त्यां च्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या सचिवपदी नेमण्यात आले. २००७ साली जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले यामुळे त्यांचा कार्याला वेगळा आयाम प्राप्त झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या सचिवपदी निवड झाल्यावर त्यांनी बांधणी साठी प्रयत्न केले विविध ठिकाणी दौरे केले २००३ साली झालेल्या सांगली महानगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीसाठी त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणून काम बघितले. २००४ साली विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून पक्षांनी त्यांची सरचिटणीस पदी त्यांची निवड केली जिल्हा परिषदेत त्यांनी भरीव कार्य केले २६ जुलै २००५ ला आलेल्या पुरात त्यांनी मोलाचे कार्य केले २००८ साली ठाणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले ठाणे जिल्हा परिषदेतील वित्त समितीतील त्याचं कार्य वाखण्याजोगी आहे. याचाच परिणाम म्हणून त्यांची सिडको च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राजकीय कार्यासोबत त्यांनी सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. १९८५ साली त्यांनी प्रियजन विकास मंडळाची स्थापना केली या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले. प्रियजन विकास मंडळाने शिव जयंती आणि बाबा साहेब आंबेडकर जयंती साजरी केली शिव जयंती ला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते १२ डिसेंबर ला मा.शरद पवार यांचा जन्मदिनाचे निमित्त साधून शरद महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रियजन गुणगौरव समितीतर्फे गुणवंतांचा जातो हिंदुराव साहेब प्रियजन नवरात्र उत्सव समिती साईबाबा उत्सव ससाणे , मुरबाड मंडळ यासारख्या अनेक संस्थांचे त अध्यक्ष आहेत