शिक्षणाच्या काळात समाजसेवेची धरली कास
कोण कोणत्या जाती पंथाचा
तो फक्त भारत देशाचा. हाच त्याचा धर्म
आणि हीच त्याची रास

सुरुवातीचा काल होता खडतर
जाण न असे कोणा कार्याची
जोड नव्हती भाग्याची
पण आग होती जिद्दीची

मग विद्यार्थांचा मेळाव्याने झाला सुरु तो अखंड यज्ञ
आणि धग्धगला उर्जेचा कुंड.स्वसुखाची दिली आहुती
आज भोगतोय त्यची रसदार फळे

शेतकरी कुटुंबात आलो जन्मा
कल्याण कराया बळी राजाचे
स्थापले मार्केट यार्ड
कृतकृत्य झालो पाहून हास्य
त्या महान अन्नादात्याचे

शिक्षणाच्या वाट केल्या खुल्या
महिलांची झाली प्रगती
३०० बचत गटांची पसरली दूरवर कीर्ती

आरोग्य शिक्षण लोककल्याण असे माझा वसा
कल्याण करूया सकलजनांचे उमटवू समाजावर ठसा

इथवरचा प्रवास होता संघर्षाने भरलेला
समाजसेवेच्या व्रताने मी होतो भारावलेला
चल उभारू सुशिक्षित समाज सुख समाधानाने भरलेला
देऊ या आकार भारत बांधणीच्या संकल्पनेला

DSC_0081“जेव्हा तू जन्माला आला तेव्हा जग हसत होते आणि तू रडत होतास आयुष्यात असे कार्य कर कि तू हसता हसत जाशील मात्र जाग तुझ्या मागे रडेल” आसे स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे.

याच एका वाक्याने भारावून जात मी संपूर्ण जगावर आपला ठसा उमटेल असे कार्य करण्याचा निर्णय घेतला. बिर्ला कॉलेज मध्ये असताना विद्यार्थाचा मळावे घ्ण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या समस्या मला जवळून बघता आल्या. आणि शिक्षण क्षेत्रात विकासाची किती गरज आहे ते मला नव्याने कळले मग युवकांचा समस्यांना मी NSUI च्या माध्यमातून वाचा फोडायला सुरुवात केली . प्रियजन युवक मंडळाची साठप्ना केल्यानंतर या कामाला आणखी वेग आला. आणि समज्सॆत कोणत्या दिशेने जायचे याची दिशा मिळण्यास सुरुवात झाली. शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतकऱ्याचा समस्या लक्षात घेतल्या देशाचे कृषी मंत्री मा शरद पवार यांचा सह्यान्ने अनेक प्रकल्प उभे केले. जिल्हा परिषदेचे केलेले कार्य आपण जाणताच

हा सगळा विकास मुरबाड जिह्यपुरता मर्यादित नव्हत आणि आता तो भविष्यात करायचा हि नाही भारत देश अखंड प्रगती करतो आहे. या प्रगती च्या कार्यात आपले थोडे फार का होईना आपले योगदान असावे असे मला कायम वाटत आले आहे आणि राहील. ठाणे आणि नवी मुंबई च्या विकासात माझा हातभार लागला आहे तो आसाच लागत रहिल. शिक्षणाने माणूस स्वयंपूर्ण होतो असा माझा विश्वास आहे तेव्हा प्रियजन विकास मंडळाच्या माध्यमातून भरीव कार्य करण्याचा माझा मानस अहे. त्याच प्रमाणे बचत गटांची संख्या १००० च्या वर असावी जेणेकरून ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी. तेव्हा या गटांची सख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरूच राहतील

सिडको चे अध्यक्षपद हि मला आअतपर्यन्त मिळालेली सगळ्यात मोठी जवाबदारी आहे . मुंबई सारख्या शहरात अनेक लोक अनेक स्वप्न घेऊन येतात पण जागेचा प्रश्न कायमच सतावत आला आहे. तेव्हा त्या सगळ्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे माझे उद्दिष्ट आहे . प्रियजन विकास मंडळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्य तर आहेच

समाजसेवा हे एक अखंड चालणारे व्रत आहे, तपश्चर्या आहे तेव्हा काम करत राहणे हे मुख्य उद्दिष्ट असावे असे मी मानतो समाज भरणीचा पाया हा आपल्या पूर्वजांनी घालून दिला आहे त्याला कळस चढवण्याचा कामात माझा सहभाग आहे हे माझे भाग्याचे लक्षण आहे. हे कार्य निरंतर चालूच राहणार आहे

शुभास्ते पन्थान सन्तु …….!!!!